Reliance JioMotive: जिओ मोटिव्ह काय आहे आणि कसे वापरावे?

How to use JioMotive: रिलायन्स जिओने पारंपारिक कार स्मार्ट बनवण्यासाठी ‘जिओ मोटिव्ह’ लाँच केले आहे. JioMotive कंपनीच्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाइट आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध झाले आहे. हे डिव्हाइस रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग, वाहन आरोग्य आणि अपघात शोध यांसारखी अनेक एडवांस फीचर्स ऑफर करते.

JioMotive काय आहे?

जिओमोटिव्ह हे एक प्लग-अँड-प्ले डिव्हाइस आहे, जे इंस्टॉल करण्यासाठी कोणत्याही एक्सपर्ट ची आवश्यकता नाही. या डिव्हाइसला कारच्या OBD पोर्टशी जोडणे आवश्यक आहे. OBD पोर्ट वाहनांमध्ये स्टीयरिंग व्हीलच्या खाली असते. Jio Motive रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग आणि अपघात शोध यांसारखी अनेक एडवांस फीचर्स ऑफर करते.

हे उपकरण फक्त जिओच्या ई-सिमवर काम करते. मात्र, यासाठी वेगळे सिम खरेदी करून ते रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. हे डिव्‍हाइस तुमच्‍या चालू जिओ सिम प्‍लॅनवरच काम करेल. जिओ च्या वेबसाइट नुसार JioMotive ची किंमत आहे 4,999 रुपये आहे.

JioMotive मध्ये कोणते फीचर्स उपलब्ध आहे?

  • रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग (Real Time location)
  • भू आणि वेळ इशारा (Geo and Time alert)
  • वाहन आरोग्य (Vehicle Health)
  • अँटी-टॉ आणि थेफ्ट अलर्ट (Anti-Tow and Theft Alert)
  • अपघात शोध (Accident detection)
  • वायफाय हॉटस्पॉट (WiFi hotspot)
  • गती ट्रॅकिंग (Speed tracking)
  • मार्ग ट्रॅकिंग (Route Tracking)

जिओ मोटिव्ह कसे वापरावे (How to use JioMotive)?

जिओ मोटिव्ह हे एक प्लग-अँड-प्ले डिव्हाइस आहे, जे स्थापित करण्यासाठी कोणत्याही तज्ञाची आवश्यकता नाही. Jio Motive ला कारच्या OBD पोर्टशी जोडणे आवश्यक आहे. कोणीही ते त्यांच्या कारला जोडून वापरू शकतो.

  1. मोबाईलच्या Play Store वरून JioThings app डाउनलोड करा
  2. तुमचा Jio नंबर वापरून JioThings app वर लॉग इन किंवा साइन अप करा.
  3. आता Jio Motive निवडा आणि app मध्ये डिव्हाइसचा IMEI नंबर प्रविष्ट करा
  4. पुढे जा वर टॅप करा.
  5. App मध्ये तुमच्या कारबद्दल आवश्यक असलेली माहिती एंटर करा आणि सेव्ह करा .
  6. Jio Motive ला OBD पोर्टशी कनेक्ट करा आणि नंतर कार सुरू करा.
  7. Jio Everywhere Connect नंबर शेअरिंग प्लॅनच्या अटी आणि शर्ती स्वीकारा.
  8. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्विस एक्टिवेशन चा कन्फर्मेशन मैसेज मिळेल.
  9. डिव्हाइस एक्टिव करण्यासाठी तुमची कार 10 मिनिटे चालू द्या. सुमारे 1 तासानंतर, तुमच्या कारचा सर्व डेटा Jiothings App मध्ये दिसू लागेल.

1 thought on “Reliance JioMotive: जिओ मोटिव्ह काय आहे आणि कसे वापरावे?”

  1. very well explained about Reliance JioMotive. jio under mukesh ambani’ vision is going to be very profitable company in future.

    Reply

Leave a Comment